तर श्रीमंत कसे व्हायचे.. हा प्रश्न आजकाल सगळयानाच पडलेला असतो.. यासाठी आपल्याला जगातील सर्वात श्रीमंत आशा व्यक्तींची मत पाहणे गरजेचे आहे. warren buffet हे जगातील सर्वात श्रीमंत आशा टॉप दहा व्यक्तिमधील आहेत.. आज आपण त्यांचे श्रीमंतीबद्दलचे काही नियम पाहणार आहोत जे त्यांनी फॉलो कले.
“हो मला माहित होतं की मी श्रीमंत होणार आणि त्याबद्दल मला एक मिनिट ही शंका नव्हती” हे वाक्य आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमधील एक वॉरेन बफेट यांचे या वाक्य मधूनच त्यांचा प्रचंड असा आत्मविश्वास दिसून येतो. आज वॉरेन बफेट जगातील सर्वात श्रीमंत अशात दहा व्यक्तींमध्ये येतात.लहान असताना वॉरेन बफेट आपल्या मित्रांना म्हणाले होते की मी जर वयाच्या तिसावर्षी अब्जधिश झालो नाही तर मी आत्महत्या करेन, अशी पैशाबद्दलची मानसिकता असणारे वॉरेन बफेट यांचे श्रीमंतीबद्दलचे पाच नियम आज आपण पाहणार आहोत आणि हे नियम नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये उपयोगी ठरणार आहेत.
1) एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका, उत्पन्नाचे दुसरे मार्ग निर्माण करा
वॉरेन बफेट यांच्या Berkshire कंपनीच्या अंडर 60 कंपन्या आहेत ,त्यामुळे जरी काही कारणांमुळे एका कंपनीला तोटा झाला तरी बाकीच्या कंपन्या त्या कंपनीला सांभाळून घेतात.
अनेक लोक आपल्या नोकरीवर किंवा आपले व्यवसायावर अवलंबून असतात .त्यामुळे ज्यावेळेस Month End ला त्यांचा पगार होतो त्यावेळेस एका आठवड्यातच त्यांचे पैसे संपून जातात मग परत ते लोक दुसऱ्या पगाराची वाट बघतात आणि हीच सायकल वर्षानुवर्षे चालत राहते. त्यामुळे पैसे वाचूवुन कुठे गुंतवणूक करणे सोडाच तर पगारातून आलेले पैसे दैनंदिन गरजांसाठी सुद्धा पुरत नाही. यासाठीच उत्पन्नाचा दुसरा मार्ग निर्माण करणे गरजेचे आहे तरीसुद्धा काही लोक म्हणतील उत्पन्नाचा दुसरा मार्ग निर्माण करणे कठीण आहे ,पण आपण हे करू शकतो .आज ऑनलाईनच्या जमान्यात Passive Income चे अनेक मार्ग उपलब्ध आहेत .आपल्या जॉब मधून किंवा व्यवसाय मधून कमीत कमी दोन ते तीन ता्स आपण काढू शकतो, या वेळात आपण ब्लॉगिंग, युट्युब, शेअर मार्केट यांसारखे स्किल शिकू शकतो .ज्यामधून आपल्याला बरेचसे मिळू शकतात. यातून तरीही काही लोक म्हणतील ऑनलाईन वगैरे आपल्याला जमणार नाही ,तेव्हा एक विचार करा तुम्ही सध्या जे काय करत आहे. यामध्ये तुम्हाला अजून काय काय वाढवता येईल ,नक्कीच अजून तुम्हाला दोन-तीन मार्ग निर्माण होतील.
2) रिस्क कशी घ्यायची..
वॉरेन बफेट यांचं रिस्क बद्दलच असं म्हणणं आहे, त्यावेळेस Risk कधीच घेऊ नका ,ज्यावेळेस आपल्याला आपल्या कामाबद्दलची पूर्ण माहिती नाही. तर त्याबद्दलची आपल्याला सर्व गोष्टी अगोदरच माहीत असाव्यात. रिस्क मध्ये आपल्याला लॉस जरी झाला तरी आपण किमान अगोदर जगत होतो तसेच लॉस नंतरही जगलो पाहिजे. म्हणजेच उदाहरणार्थ आपल्याकडे पाच ते सहा लाखांची सेव्हींग असेल तर आपण एक ते दोन लाखांची रिस्क घेऊ शकतो जेणेकरून राहिलेले तीन लाख जरी आपला प्लॅन फेल झाला तरी आपल्या कामी येतील.
3) Age Is Just A Number…वय ही फक्त एक संख्या आहे.
आजच्या काळातील १३ वर्षाचा मुलगा काय करतो ,ज्यावेळेस वॉरेन बफेट तेरा वर्षाचे होते, त्यावेळेस त्यांनी पहिला इन्कम टॅक्स भरला होता. वयाच्या अकराव्या वर्षापासून गुंतवणूक करणारे वॉरेन बफेट यांनी त्यांच्या सोळा वर्षी 9800 डॉलर्स कमावले होते .लहानपणापासून वॉरेन बफेट यांनी वेगवेगळे व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती .जसे की पेपर विकणे, मॅगझिन विकणे .लहानपणी आपलं बिजनेस Mindset त्यांनी डेव्हलप केलं होतं. आपलं वय आता किती असो तुम्हाला जे काय करायचे याबद्दल तुम्हाला प्रचंड असा आत्मविश्वास हवा आहे .वॉरेन बफेट तेराव्या वर्षी श्रीमंत झाले नाही, तर त्यांनी 13 वर्षी श्रीमंत होण्याचे पहिले पाऊल टाकले होते त्यासाठी आपल्याला आपल्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकण्यास आपण सुरुवात केली पाहिजे या प्रवासामधूनच तुम्हाला एक अशी आयडिया सापडेल की तुमचा आयुष्य बदलेल