बजाज सीएनजी बाईक खरच सुरक्षित आहे का?.. BAJAJ FREEDOM 125 CNG Bike Safe OR Not..

जुलै 2024 ला देशातील पहिली सीएनजी बाईक लाॅंच झाली, त्या बाईकचं नाव आहे Bajaj Freedom 125 CNG ही बाईक लाॅंच झाल्यापासून या बाईककडे लोकांचं चांगलं आकर्षण दिसून आलं पण या बाईक बद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण होत आहेत, जसं की खरंच ही बाईक सुरक्षित आहे? बजाज सीएनजी बाईक खरच सुरक्षित आहे का? bajaj freedom 125 cng bike safe or not..

Bajaj Freedom 125 CNG Crash Test

Bajaj Freedom ही एक सीएनजी बाईक आहे .सीएनजी म्हटल्यावर लोकांच्या मनात सुरक्षेबद्दल कायम प्रश्न येतात आणि त्यात भर म्हणजे रस्त्यावर सीएनजी वाहनांना आग लागण्याच्या बातम्या आपल्याला सारख्या पाहायला मिळतात .पण या बाईक बाबत बजाज कंपनीचं असं मत आहे की “ही बाईक पूर्णपणे सुरक्षित आहे, यासाठी कंपनीचा असा दावा आहे की या बाईकमध्ये सीएनजी टॅंक असल्यामुळे बाईकची दोन वेळा क्रॅश चाचणी करण्यात आली असून यामध्ये सीएनजी टॅंक ला काहीच नुकसान झाले नाही. यामध्ये दुसरी चाचणी तर अशी होती की मोठा ट्रक बाईक वरून घालण्यात आला तरीही बाईकच्या सीएनजी टॅंकला काहीच नुकसान झाले नाही. कंपनीचा असा दावा आहे की बाईकसाठी एकूण 11 चाचण्या करण्यात आल्या असूनही बाईक पूर्णपणे सुरक्षित आहे.

Bajaj Freedom 125 crash TEST

Bajaj Freedom 125cc चे फायदे

ही बाईक 125cc हाय पावर इंजिन सोबत येते .बजाज फ्रीडम ही हाय स्पीड बाईक असणार आहे .रोडवर ही बाईक टॉप स्पीड 93.4 किलोमीटर पर हावर देईल, ही बाईक सीएनजी वर सुमारे 213 किलोमीटर आणि पेट्रोलवर सुमारे 117 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेज देते. टायर्स मध्ये या बाईला ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत शिवाय 17 इंचाचे Alloy व्हिल सुद्धा आहेत. बेस मॉडेल मध्ये 95 हजार रुपये पासून ही गाडी शोरूम मध्ये उपलब्ध असेल.

BAJAJ FREEDOM 125 CNG

वैशिष्टे

बजाज फ्रिडम बाईक मध्ये ड्युअल कलर्सचा पर्याय दिलेला आहे.

बाईकस्वारांना लांब प्रवासासाठी
सिंगलपीस आरामदायी सीट दिले आहे.

सुरक्षेसाठी ड्रम आणि डिस्क ब्रेक्स दिलेले आहेत .

बाईकच्या हँडल बार मध्ये सीएनजी आणि पेट्रोल शिफ्ट बटन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी बघायला मिळेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top