Google आता वापरात नसणारी Gmail खाती बंद करून टाकण्याची कठोर कारवाई सुरू करणार आहे. 20 सप्टेंबर पासून ही कारवाई सुरू होईल. यामध्ये दोन वर्षापासून वापरात नसणारी खाती बंद केली जाणार आहेत.
गुगलचे जीमेल वापरणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे.
कारण गुगल आता अकाउंट Inactive Account Policy सुरू करणार आहे. ज्यामध्ये गुगल फोटो आणि गुगल ड्राईव्ह वापरणारे लोक अडचणीत येऊ शकतात ,कारण या पॉलिसी अंतर्गत गुगलचे लाखो जीमेल खाते आता बंद होणार आहे.
कोणती Gmail खाती बंद होणार आहेत?
गुगलच्या अहवालानुसार जर तुम्ही गेल्या दोन वर्षापासून वापरात नसलेले जीमेल अकाउंट वापरत असाल तर ते बंद होणार आहे. ही सर्व खाती हटवण्यापूर्वी गुगल सर्व युजर्स ना एक अलर्ट देणार आहे जेणेकरून जीमेल वापरणारे युजर्स आपल्या सर्व डेटा सुरक्षित करू शकतील.
अशाप्रकारे तुम्ही आपला डेटा सेव्ह करू शकाल..
यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंट वर लॉगिन करावे लागेल, त्यानंतर तुमच्या पुढे गुगल टेक आऊट चे पेज येईल . यानंतर तुमच्या समोर ऑप्शन येतील त्यामध्ये तुम्हाला कोणत्या उत्पादनाचा डेटा सुरक्षित करायचा आहे त्याला सिलेक्ट करावे लागेल. यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील सिलेक्ट डेटा आणि फुल डेटा ,ज्यावर तुम्हाला टिकमार्क करावी लागेल यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही तुमचा डेटा सेव्ह करू शकाल.
गुगल ही खाती का बंद करणार आहेत?
गुगलच्या म्हणण्यानुसार जीमेल खाती वापरात नसतात.. त्यामुळे गुगलच्या सर्व स्टोरेज मध्ये वाढ होत होते आणि ही वापरात नसलेली खती हॅक होऊ शकतात ,गुगलच्या म्हणण्यानुसार या सर्व खात्यांमध्ये पर्सनल जीमेल आणि गुगल फोटोज इ. आहेत
खाती बंद होण्यापूर्वी आपल्याला कसे कळणार?
20 सप्टेंबर पासून सुरू होत असलेल्या या पॉलिसीमध्ये पहिल्या स्टेजमध्ये गुगल या खात्यांना हटवणार आहे ,तरी याबद्दल काळजीचे कारण नाही कारण जीमेल खाती बंद होण्यापूर्वी तुमच्या रिकव्हरी जीमेलवर किंवा गुगल अकाउंट वर एक अलर्ट टाकला जाईल ..त्यानंतरची प्रोसेस तुम्ही पुढे करू शकाल..