Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी चालू केली आहे. आता ही योजना पुढच्या टप्प्यात आली आहे , राज्यातील बहुतांश महिलांच्या खात्यात पहिल्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत .आता तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
तिसरा हप्ता –
सप्टेंबरमध्ये या योजनेतून तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे . महिलांच्या बँक खात्यामध्ये 17 ते 19 या तारखे मध्ये पैसे जमा होत आहेत ,काही महिलांच्या खात्यात अगोदरच हा तिसरा हप्ता जमा झाला आहे असे महिला व बालविकास विभागाने सांगितले आहे.
लाभार्थी महिलांनी आपला मोबाईल च्या लिंक नंबर वरचा मेसेज तात्काळ तपासून पहावा. मेसेज आला नसेल तरीही चिंतेचे कारण नाही , काही टेक्निकल इशूमुळे थोडा वेळ लागू शकतो.महिलांनी अशावेळी आपल्या अर्जाची स्थिती आणि बँकशी संपर्क साधावा
किती पैसे जमा होतील ?
राज्यातील महिलांमध्ये या तिसऱ्या हप्त्यात नक्की किती पैसे खात्यावर येणार आहेत,याबद्दल संभ्रम आहे. ज्यांचे अगोदरचे हप्ते राहिले असतील त्यांना 4500 रुपये आणि काहींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील.
योजनेत येणाऱ्या अडचणी
Ladki Bahin Yojana ही महिलांसाठी एक उपयुक्त आणि आर्थिक पाठबळ देणारी गरजेची योजना ठरली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील सामान्य परिस्थितील महिलांना या योजनेचा चांगलाच उपयोग झाला आहे . या योजनेतून मिळणाऱ्या लाभातून महिला शिक्षण ,आरोग्य ,व्यवसाय यामध्ये आलेले पैसे खर्च करीत आहेत.
मात्र योजनेमध्ये काही महिलांसमोर आव्हाने येत आहेत, मुळात काही महिलांना या योजनेची पुरेशी माहिती मिळत नाही. काहींची बँक खाते उघडण्यास अडचण येत आहे. काहींच्या खात्यावर वेळेवर हप्ते जमा होत नाहीत.या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे.
या योजनेअंतर्गत महिलांसाठी महत्त्वाचे
1) तुम्हाला या योजनेची माहिती असेल तर अन्य महिलांना सुद्धा या योजनेची माहिती द्यावी जेणेकरून सर्वांना लाभ मिळेल.
2) या योजनेतुन आलेल्या पैशाचा वापर हा काळजीपूर्वक करावा शक्यतो त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करावा.
3) योजनेसाठी दिलेले बँक खाते सतत अपडेट ठेवावे.
4) काही तांत्रिक अडचणी आल्यास स्थानिक प्रशासनासोबत संपर्क साधावा.
राज्य सरकारचे योजनेनंतरचे धोरण
राज्य सरकार जास्तीत जास्त महिलांना या योजनेत सहभागी करून घेणार आहे, जेणेकरून या योजनेचा विस्तार होऊन महाराष्ट्रातील सर्व महिलांना याचा लाभ मिळेल. शिवाय यातून कौशल्य विकास कार्यक्रम ही सरकार राबवणार आहे.
लाडकी बहीण योजना मुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली आहे. महिलांच्या आर्थिक जीवनासाठी राज्य सरकारचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाणार आहे.