Railway – रेल्वे रुळावर सातत्याने वेगवेगळ्या अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. त्यामध्ये रुळावर दगड, स्फोटके ठेवण्याच्या घटना सतत होत असतात यामुळे भारतीय रेल्वेलाच नाही तर प्रवाशांच्या जीवालाही धोका होऊ शकतो
या अपघातांना आळा घालण्यासाठी Railway मंत्रालय आता रेल्वे इंजिन आणि कोच मध्ये कॅमेरे बसवणार आहे . NER चे 100 लोको कॅमेरे हे पहिल्या टप्प्यात बसवण्यात येणार आहे, शिवाय रेल्वे इंजिनच्या समोर आणि बाजूला हे कॅमेरे बसवले जातील.
प्रत्येकी आठ कॅमेरे एका ट्रेनमध्ये असतील. या कॅमेरामुळे रेल्वे रुळाच्या पुढे आणि आजूबाजूला नजर ठेवली जाणार आहे, जर रुळावरून काही वस्तू असतील तर ड्रायव्हरला इंजिन मध्ये असलेल्या मॉनिटरवर या वस्तू सहज दिसतील यामुळे रेल्वे वाहतूक मधील धोके आणि अडथळे कमी होतील. येत्या तीन महिन्यात हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
रेल्वेच्या या संपूर्ण प्रोजेक्टसाठी एकूण बाराशे कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. रेल्वेच्या प्रकल्पामुळे जर एखादी दुर्घटना घडली तर त्या मागची कारणे शोधण्यासाठी या कॅमेराचा चांगला उपयोग होणार आहे .झालेल्या दुर्घटनेची कारणे शोधण्यासाठी
रेल्वे पथकांना फक्त चालकांवर विसंबुन रहावे लागणार नाही.
आता गोरखपूर लोको शेडमध्ये कॅमेरे बसवले जातील..कॅमेरास बसवण्यासाठी आता लवकरच Tendering Process सुरू केली जाईल, ही प्रक्रिया एकदा सुरू झाली की कॅमेराज बसविण्याचे काम सुरू होईल